शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात युवक मेळावा व चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:22 IST

वाशीम : सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जि.प. वाशीम अंतर्गत  स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात  व्यसनमुक्ती सप्ताहाअंतर्गत युवक मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य  जमधाडे  तर व्यसनमुक्ती मार्गदर्शक पंकज चव्हाण, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त संतोष खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व ...

वाशीम : सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जि.प. वाशीम अंतर्गत  स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात  व्यसनमुक्ती सप्ताहाअंतर्गत युवक मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य  जमधाडे  तर व्यसनमुक्ती मार्गदर्शक पंकज चव्हाण, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त संतोष खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहीर संतोष खडसे यांनी आपल्या शाहीरी कलेतून व्यसनापासून निर्माण होणारे धोके समजावून सांगत युवा पिढीने व्यसनापासून दुर राहण्याचे आवाहन केले. मनुष्यजन्म हा एकच वेळ मिळत असून युवा पिढीने व्यसनाला विरोध करुन आपली शरीर संपत्ती ही सुद्ढ ठेवावी असे आवाहन संतोष खडसे यांनी केले. पंकज चव्हाण म्हणाले की, युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी या व्यसनाला बळी न पडता त्याचा आपल्या मनशक्तीने विरोध करावा. मनाला संयमीत ठेवून आपल्यासोबतच इतरांनाही व्यसनाला बळी पडण्यापासून रोखावे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राऊत, प्रा. घुगे यांनी मोलाचे सहकार्य केले. सुत्रसंचालन शुभम काळमुंदळे यांनी केले तर आभार निलेश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी, विद्याथीर्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते.