शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

वाशिमच्या मैदानावर रंगली कुस्ती स्पर्धा!

By admin | Updated: October 17, 2016 02:08 IST

बालासाहेब यात्रोत्सवाचे औचित्य साधून कुस्ती स्पर्धा; १६ ऑक्टोबरला होणार समारोप

वाशिम, दि. १६- महाराष्ट्र कुस्तीगीर व क्रीडा मंडळाच्या वतीने श्री बालासाहेब यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेला शनिवार, १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेचे यंदा ५0 वे वर्ष असून राज्यभरातील मल्ल याठिकाणी दाखल झाले आहेत. १६ ऑक्टोबरला या स्पर्धेचा समारोप झाला. स्व. गोविंदराव भालेराव यांच्या स्मरणार्थ दरवर्षी येथे बालासाहेब यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेची परंपरा जोपासली जाते. महाराष्ट्र कुस्तीगीर व क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून होणार्‍या या उपक्रमातून समाजाला बलवान, शीलवान, चरित्र्यवान बनविण्याचा उदात्त हेतू बाळगला जातो. कुठलेही शुल्क न आकारता मल्लांना प्रवेश असणार्‍या या स्पर्धेचे यंदा ५0 वे वर्ष आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर मंडळाच्या हौदातून आतापर्यंत महाराष्ट्र केशरी, हिंद केशरी, विदर्भ केसरी असे अनेक मल्ल खेळून गेले आहेत. १५ ऑक्टोबरला पार पडलेल्या स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस ७ हजार रुपये स्व. बबनराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवाजी इंगळे यांच्यातर्फे देण्यात आले; तर द्वितीय ६ हजार रुपये रोख बालू मुरकुटे यांच्यातर्फे, तृतीय ५ हजार रुपये स्व. छोटेलाल ठाकूर यांच्या स्मरणार्थ संग्राम ठाकूर यांच्यातर्फे, चतुर्थ ३ हजार रुपये धनंजय गोटेतर्फे, पाचवे २ हजार रुपये स्व. दशरथ तुपसांडे स्मरणार्थ गजानन तुपसांडेतर्फे देण्यात आले. १६ ऑक्टोबर रोजी खेळविल्या गेलेल्या कुस्त्यांचे प्रथम बक्षीस ५0 हजार रुपये व १ किलो चांदीची गदा गिरीश लाहोटी व तरणसिंग सेठी तिरुपती ग्रुपतर्फे देण्यात आले. द्वितीय बक्षीस ३१ हजार रुपये स्व. सहदेव मलिक यांच्या स्मरणार्थ नितेश मलिक यांच्यातर्फे, तृतीय बक्षीस २१ हजार रुपये रोख राजू पाटील राजे यांच्यातर्फे, चौथे बक्षीस ११ हजार रुपये रोख स्व. तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ नारायणराव जाधव यांच्यातर्फे देण्यात आले, अशी माहिती आयोजकांनी दिली