शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्या जगतात चिऊताई झाली भुर्रर्रऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:44 IST

वाशिम : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी ...

वाशिम : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. नियमितपणे आपल्या अंगणात ती पहुडताना दिसायची; मात्र आजच्या मोबाइलच्या युगात ही चिऊताईच कुठे दिसेनाशी झाली आहे. भुर्र...भुर्र...उडून जात नेमकी कुठे गायब झाली आहे, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

आधुनिकतेचे पांघरूण घालून आपण आज प्रगतीची शिखरे सर करत आहोत. हे करत असताना आपल्या बालपणी चिऊ आणि काऊची गोष्ट साऱ्यांनाच आवडायची; मात्र या गोष्टीतील चिऊताई आधुनिकतेच्या विकासाला बळी पडल्याचे दिसत आहे. मोबाइलची क्रांती ही साऱ्यांच्याच फायद्याची ठरली; मात्र या लहानशा चिऊताईच्या जीवावरच उठली. यामुळे नियमितपणे अंगणात वावरणारी चिमणी आता क्वचितच पाहायला मिळत आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून मोबाइल टॉवर व त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चिमण्यांच्या संहाराला कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.

या लहरींची तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसा याचा गंभीर परिणाम इवल्याशा चिमणीला भोगावा लागत आहे. आज जगभरात जवळपास चिमण्यांच्या २६ जाती पाहायला मिळतात. आजच्या परिस्थितीत यांची संख्या मात्र कमी होत आहे. लहान बालकांना जेवण भरवताना एक घास चिऊचा, एक काऊचा म्हणत ही पिढी मोठी झाली आहे. मात्र, येणाऱ्या पिढीला हा इवलासा पक्षी पाहायला मिळेल की चित्रातच पाहावे लागेल, हा प्रश्नच आहे.

त्यामुळे येणाऱ्या पिढीला चिऊ काऊंच्या गोष्टीमधील चिऊचे पुन्हा दर्शन होण्यासाठी आपणच प्रयत्नशील असायला हवे. अन्यथा, पुढील काही वर्षांत चिमणी हा पक्षीच नामशेष होईल, अशी भीती पक्षी निरीक्षकांमधून व्यक्त होत आहे.

०००

चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम

चिमणी हा पक्षी नावाप्रमाणेच दिसायलाही लहान असला, तरी निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. शेतातील किडीचे संतुलन ठेवत चिमण्या एकप्रकारे शेतकऱ्याला मदतच करतात. मात्र, वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषण याचा फटका या लहानशा जीवाला बसला आहे. मोबाइल टॉवर्सच्या माध्यमातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यांची संख्या कमी होत असून, यामुळे ही प्रजाती नामशेष न होता त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.