शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘सहस्त्र सिंचन’च्या १२00 विहिरींची कामे सुरू

By admin | Updated: April 30, 2017 02:30 IST

उद्दिष्ट गाठण्यासाठी धावपळ ; ३0 जूनपर्यंंत पूर्ण कराव्या लागणार सहा हजार विहिरी.

वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजना राबविली जात आहे. या अंतर्गत ३0 जूनपयर्ंत सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करावयाची असून, १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता कृषी विभागाची धावपळ सुरू आहे. पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २0१६ पयर्ंत अर्ज स्वीकारून १0 जानेवारी २0१७ पयर्ंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपयर्ंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतु या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. त्यामुळे लाभार्थींंची निवड करण्यास विलंब लागला. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांकडून प्राप्त १८ हजार ४४५ अर्जांंपैकी ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेच्या लाभार्थींंची निवड करण्यासाठी सहा तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्यानंतरही मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाशिम तालुक्यात १0 विहिरींची, तर मानोरा तालुक्यात पात्र ठरलेल्या केवळ २ विहिरींची कामे सुरू झाली होती. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही ग्रामसभांचे आयोजनच करण्यात आले नव्हते. त्यामुळे निर्धारित उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे यांनी वारंवार बैठका घेऊन आपल्या सहकार्यांंना कामाची गती वाढविण्यास सांगितले. त्यामुळे शनिवार, २९ एप्रिलपर्यंंत जिल्ह्यात १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू होऊ शकली असून, येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित विहिरी सुरू होऊन सहस्त्र सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.