शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड घेतले जाणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:34 IST

अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम एमआयडीसी४५0 एकर जमीन विनावापर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमध्ये असलेल्या ‘एमआयडीसी’पैकी वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसीत टप्प्याटप्प्याने सर्वच प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. असे असले तरी ५३७ एकर क्षेत्रापैकी आजमितीस केवळ २५ एकर क्षेत्रावरच सात उद्योग उभे झाले. तथापि, गत अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिममध्ये हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्रात ‘एमआयडीसी’ वसलेली आहे. गेल्या काही वर्षांत ‘एमआयडीसी’ परिसरात कोट्यवधी रुपयांचा निधी खचरून चकाचक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. आवश्यक त्या सर्वठिकाणी विद्यूत पथदिवेदेखील लावण्यात आले. उद्योगधंद्यांच्या पाण्याची अडचण भागविण्याकरिता नजीकच्या बोराळा धरणावरून पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र प्राथमिक स्तरावर उद्योगधंद्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्यामुळे अपेक्षित प्रयत्न झाल्यास मोठय़ा कंपन्या वाशिमच्या एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करू शकतात; मात्र त्यासाठी प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची नितांत आवश्यकता भासत आहे.वाशिममध्ये वाटप करण्यात आलेल्या ९७ भूखंडांपैकी आजमितीस सुमारे ९0 भूखंडांवर ज्यांनी मालकी हक्क ठेवला आहे, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून प्रस्तावित उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत बांधकाम करून उद्योग सुरू न झाल्यास भूखंड परत करण्याचा नियम आहे. त्यानुसार, लवकरच भूखंड परत घेण्याची ठोस कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार आहे.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’त उद्योगांसाठी पोषक स्थिती!अमृतसर, इंदूर, खंडवा, अकोला, नांदेड, हैद्राबाद यासह अनेक बड्या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग वाशिममधून गेला असून, आंध्रप्रदेशची सीमादेखील जिल्हय़ापासून काहीच अंतरावरच आहे. मोठय़ा उद्योगधंद्यांसाठी ही बाब निश्‍चितपणे पोषक ठरणारी आहे.

८३0 कोटींचा प्रकल्प वळता झाला नागपुरात!सन २0१५ मध्ये ‘कोका कोला’ या कंपनीच्या काही प्रतिनिधींनी ‘एमआयडीसी’मध्ये जागेची पाहणी केली होती; मात्र त्यांना प्रशासनाकडून तद्वतच राजकीय क्षेत्रातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ८३0 कोटी रुपयांचा हा प्रकल्प वाशिमऐवजी नागपुरात वळता झाला.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’मध्ये उद्योगास लागणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना भूखंड मिळाला, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून उद्योग सुरू करणे क्रमप्राप्त आहे. असे न झाल्यास दिलेला भूखंड परत घेण्याची कार्यवाही केली जाईल.- सी.एस. डोईजडक्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी- 

टॅग्स :MIDCएमआयडीसी