शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ठिकाणीच होणार बांधकाम कामगारांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 19:47 IST

वाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ख-या बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणावरच करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपी. आर. महालेनोंदणी शिबिरात कामगारांच्या समस्यांचे निराकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ख-या बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणावरच करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार, डिसेंबर २०१७ पर्यंत खरे बांधकाम कामगार नोंदणीपासून व लाभापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी कामाच्या ठिकाणीच नोंदणी शिबीरांचे आयोजन केले जात असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी पी.आर. महाले यांनी दिली. १५ आॅक्टोबर रोजी नोंदणी आस्थापना मालक साबेरखान पठण यांच्या कामाच्या ठिकाणी आयोजित नोंदणी शिबीरात ते बोलत होते. या शिबीराचे आयोजन असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय मंडवधरे, जिल्हाध्यक्ष शे. सईद यांची उपस्थिती होती. शिबीरात नवीन नोंदणी, नुतनीकरण, शिष्यवृत्ती व विविध लाभांचे अर्ज स्विकारणे ही कामे करण्यात आली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सामाजीक सुरक्षा म्हणून कामगार अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये अनुदान, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, मयत कामगाराच्या वारसास वर्षाला २४ हजार रुपये, पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणासाठी २५०० रुपये, आठवी ते दहावीपर्यंत ५ हजार रुपये, १० वी, १२ वी उत्तीर्ण व ५० टक्के गुण मिळाल्यास १० हजार रुपये,  पदवी शिक्षणासाठी २० हजार रुपये, पदव्युत्तर शिक्षणासाठी २५ हजार रुपये, अभियांत्रिकी ६० हजार व वैद्यकिय शिक्षणासाठी एक लाख रुपये प्रतिवर्ष शिष्यवृत्ती, गंभीर आजारासाठी २ लाखापर्यत खर्चाचा परतावा, असे प्रमुख लाभ मंडळातील नोंदणीकृत कामगारांना देण्यात येतात, अशी माहिती महाले यांनी यावेळी दिली.