वाशिम, दि. १६- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व मजुरांची मजुरी १ एप्रिल २0१७ पासून त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात ह्यऑनलाइनह्ण जमा करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील नोंदणीकृत मजुरांनी आपले आधार क्रमांक लवकरात लवकर बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे. जे मजूर ही प्रक्रिया पार पाडणार नाहीत, त्यांना मजुरीपासून वंचित राहावे लागू शकते, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी गुरुवारी दिली.
१ एप्रिलपासून मजुरांची मजुरी होणार खात्यात जमा!
By admin | Updated: March 17, 2017 02:45 IST