शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावाचे काम रखडलेलेच!

By admin | Updated: May 30, 2017 01:33 IST

शेतकरी नाराज: सात वर्षांपासून जमीन अधिग्रहणाची प्रकिया अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क लोहगाव महागाव : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलले साठवण तलावाचे काम विविध अडचणींमुळे अद्यापही पूर्ण झाले नाही. एकिकडे शासन जलयुक्त शिवार अभियान राबविते, तर दुसरीकडे सुरू केलेल्या जलप्रकल्पांचे कामही पूर्ण करीत नाही. त्यामुळे शासनाचे धोरण नेमके आहे तरी कोणते ते समजणे कठीण होऊन बसले आहे. ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई भासू नये, त्याशिवाय सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला जावा. या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खर्चून ठिकठिकाणी बांध आणि साठवण तलावाची निर्मिती करीत आहे. जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना सुरू करीत आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयेसुद्धा खर्च करीत आहे; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमल बजावणी होत नसल्यामुळे शासनाच्या अब्जावधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. असेच एक उदाहरण कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे पाहायला मिळत आहे. लोहगाव महागाव येथे साधारण पाच वर्षांपूर्वी लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाला मंजुरी मिळाली. या तलावामुळे लोहगाव महागाव परिसरातील जवळपास १३८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार. या तलावासाठी आवश्यक जमिनही शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत करण्यात आली. तलावाच्या कामाचे भूमीपुजन तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि भूमीपुजनानंतर पाच ते सहा महिन्यांतच या तलावाचे काम सुरू झाले. हे काम सुरळीतपणे चालु राहिल्यास मजुरांना रोजगार मिळेल आणि शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लोहगाव महागाव परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु या तलावाचे काम गत दोन वर्षांपासून बंद पडले आहे. यंदा कारंजा तालुक्यावर दुष्काळी स्थिती ओढवल्याने कृषी उत्पन्नात मोठी घट झाली, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला असून, पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. लोहगाव साठवण तलाव वेळेत पूर्ण झाला असता, तर लोहगाव परिसरातील जनतेला उपरोक्त समस्यांचा सामना करावा लागला नसता. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे आज रोजी परिसरात सिंचनासह चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही समस्या जाणवत आहे. त्यामुळे शासनाच्या वेळकाढून धोरणाबाबत परिसरातील जनता व शेतकरी वर्गांत नाराजीचे वातावरण आहे. संबंधितांनी याची जाणीव ठेवून या साठवण तलावाचे काम सुरू करून ते त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी व जनतेकडून होत आहे. लोहगाव महागावच्या तलावासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अधिग्रहणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत सुधारित अंदाजपत्रक तयार करून त्याच्या प्रशासकीय मान्यतेचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. -अमोल पाटीलउपविभागीय अभियंता, लघू पाटबंधारे उपविभाग कारंजा लाड