शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून ...

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून संबंधित क्षेत्रात लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. नियोजन भवन येथे ५ जुलैरोजी आयोजित आचारसंहिता अंमलबजावणीविषयी सभेत ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, आचारसंहिताविषयक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रांमधील शासकीय मालकीच्या जागा, इमारती तसेच खासगी मालकीच्या जागा याठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात कोणतेही नवीन काम सुरू करणे, तसेच या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही घोषणा करण्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय यंत्रणांनी या अनुषंगाने विशेष खबरदारी घ्यावी. आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही दिल्या.

००००

मतदान केंद्रांची आवश्यक दुरुस्ती

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात एखादे अत्यावश्यक काम करावयाचे असल्यास संबंधित विभागाने लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करावा. त्याविषयी स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच असे काम करता येईल. तसेच ज्या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशा ठिकाणी मतदान केंद्रांची आवश्यक दुरुस्ती करण्याची कामे करण्याची परवानगी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले.

०००

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तक्रार करावी

पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शासकीय विभागणी समन्वय ठेवून काम करावे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास निष्पक्षपाती कारवाई करावी. शासकीय इमारती, जागेमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित विभागाने पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल करावी. पोलीस विभागाकडून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल.