या सोडतीद्वारे जिल्ह्यातील एकूण ४९० ग्रामपंचायतींपैकी २४६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. यापैकी अनुसूचित जातीमधील महिलांसाठी ५०, अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ६६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ११० ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित झाले आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून होते. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर काढण्यात आलेल्या महिला सरपंच पदाच्या अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.) यांच्या आरक्षणात फारसा बदल झाला नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाशिम तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या काटा, कोंडाळा झामरे, वारा जहागीर या ग्रामपंचायतचे सरपंच पद महिला एस.सी. प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांना लाॅटरी लागली. नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तामसी, वारला या ग्रामपंचायती महिलांसाठी तर कोेंडाळा महाली, तोरनाळा, काजळांबा येथे महिला आरक्षण नसल्याने इच्छुकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
00000000
वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी १०, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १९ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे.
000000
रिसोड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १८ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे.
00000
मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी ७, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १६ ठिकाणी आरक्षण निश्चित करण्यात आले.
0000
मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १० आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १७ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले.
00000
कारंजा तालुक्यातील ९० पैकी ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १२ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २२ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे.
00000
मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ५, अनुसूचित जमाती महिलांसाठी ५, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १८ ठिकाणी आरक्षण निश्चित झाले आहे.
0000
असे आहे सरपंच महिला आरक्षण
२४६
महिला सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती
——-
५०
अनु. जाती
——-
२०
अनु. जमाती
——
६६
ना.मा.प्र.
——
११०
सर्वसाधारण