२३ मार्च रोजी आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट प्रतिनिधी, महिला सरपंच, सदस्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून महिला व मुलींना जाणवणाऱ्या विविध समस्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. महिला व मुलींना मासिक पाळी येणे, ही नैसर्गिक बाब असून, शरीरातील ‘हार्मोन्स’मध्ये बदल होत असतात. अशावेळी त्यांना मानसिक आधार मिळणे गरजेचे असते. शिशू व माता निरोगी राहण्याकरिता वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या साधनांची योग्य विल्हेवाट लावणेही गरजेचे आहे. त्याअनुषंगाने गावोगावी आशा, अंगणवाडी सेविका, बचतगटांच्या प्रतिनिधी, ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना आधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक गावात पाच मास्टर ट्रेनर नियुक्त करून गावातील महिला-मुलींना प्रशिक्षित केले जाणार आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले.
वैयक्तिक स्वच्छतेकडे महिलांनी विशेष लक्ष पुरवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST