शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात निघणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:15 IST

Will the vehicle you are using be scrapped?: मालकाचा थांगपत्ता लागत नसलेली १० वाहने गत आठवड्यात भंगारात काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र सरकारने ‘स्क्रॅप पॉलिसी’ जाहीर केली आहे. त्यानुसार, १५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी खासगी वाहने आणि १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी व्यावसायिक वाहने भंगारात निघणार आहेत. वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून या ‘पॉलिसी’ची अंमलबजावणी सुरू झाली असून मालकाचा थांगपत्ता लागत नसलेली १० वाहने गत आठवड्यात भंगारात काढण्यात आली.१५ वर्षांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांमधून अधिक प्रमाणात प्रदुषण होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची भिती आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने अशी वाहने ताब्यात घेऊन भंगारात काढण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून, आतापर्यंत १० वाहने भंगारात काढण्यात आली आहेत, अशी माहिती प्राप्त झाली.

गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेटरस्त्यावर धावणारे वाहन हे सुस्थितीत असल्यास सुरुवातीपासूनच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट दिले जाणार आहे. ते पाच वर्षांसाठी असेल. यासह कमाल तीनवेळा मिळेल, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.

भंगारातील ५०० वाहने धावतात रस्त्यावर जिल्ह्यात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ झालेली सुमारे ५०० वाहने आताही रस्त्यावर धावत आहेत. त्यातील बहुतांश वाहनांची नोंदणीदेखील नाही. यामुळे ती जप्त करून भंगारात काढण्याचे मोठे आव्हान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास पेलावे लागणार आहे.

भंगारात दिल्यास मिळणार १५ टक्के लाभवाशिम जिल्ह्याची लोकसंख्या जेमतेम १३ लाखांच्या आसपास असून जिल्ह्यात वाहनांचीही संख्या मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे फारशी वाहने भंगारात निघणार नाहीत. जी वाहने तुलनेने बरीच जुनी झाली, ती भंगारात दिल्यास १५ टक्के लाभदेखील दिला जाणार आहे. 

गतवेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘स्क्रॅप पॉलिसी’ लागू करण्याचा निर्णय झाला. त्याची वाशिम जिल्ह्यातही अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकारातील १० वाहने भंगारात काढण्यात आली आहेत. यापुढील काळात या कामास गती दिली जाणार आहे. - ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम