शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुलांनी भरला होकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST

लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डाॅक्टरांना ईश्वराचे रूप मानले जाते. कोरोनाच्या संकटकाळात त्याची अनेकांना प्रचिती येत आहे. सकाळपासून रात्री ...

लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डाॅक्टरांना ईश्वराचे रूप मानले जाते. कोरोनाच्या संकटकाळात त्याची अनेकांना प्रचिती येत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दवाखान्यात हजर राहून रुग्णांची सेवा करणाऱ्या डाॅक्टरांना कुटुंबास, मुलांना पुरेसा वेळ देता येणे सध्यातरी अशक्य झाले आहे. तशीच परिस्थिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची असून, कोरोनाची साखळी तोडण्याकरिता अवलंबिण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची चोख जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामांचे तासही वाढवून देण्यात आले आहेत. यामुळे संबंधितांना कुटुंबापासून अधिकांशवेळ दुर राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात तुम्हीही पोलीस, डाॅक्टरच होणार का, असा सवाल त्यांच्या मुलांना केला असता, वडील जनसेवेत रात्रंदिवस काम करत असल्याने आम्हीसुद्धा डॉक्टर व पोलीसच होऊन लोकांची सेवा करू, इशी इच्छा मुलांनी व्यक्त केली.

..........................

३५

कोरोनायोद्धे शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर

१५०

आरोग्य कर्मचारी

९२

पोलीस अधिकारी

१३९८

पोलीस कर्मचारी

..........................

पोलीस व्हायला निश्चित आवडेल

माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे. जनतेची सेवा करण्यासाठीच ते पोलीस झाले, हे त्यांनी मला वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे ते मला पुरेसा वेळ देत नाहीत, याबाबत माझी कुठलीच तक्रार नाही. ते लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मी देखील भविष्यात पोलीस दलात मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे.

- अश्वजित विजय अरखराव

.................

माझी आई पोलीस असल्याने तिला कर्तव्य पार पाडण्याकरिता नेहमीच घराबाहेर राहावे लागते. कधीकधी तर जेवत असतानाच तिला फोन येतो. अशावेळी ती जेवण अर्ध्यावर सोडून निघून जाते. कामामुळे तिला मला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे मला भविष्यात पोलीस नाही; तर वैज्ञानिक व्हायचे आहे.

- वेदांत मुरलीधर उत्तरवार

...................

माझे वडील पोलिसांत असून ते सदैव जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असतात. कामाच्या धावपळीत मला त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून काय झाले? आधी कर्तव्य; नंतर कुटुंब, ही त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे. मी सुद्धा भविष्यात पोलीसच होणार आहे.

- तेजस रवी खडसे

...............................

कोरोना असेल तरी डाॅक्टरच होणार

माझी आई प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता अधिकारी आहे. गेल्या वर्षभरापासून तिचा कोरोना रुग्णांशी जवळचा संबंध येत आहे. गेल्या काही दिवसांत तिचे कामही वाढले आहे; पण तिच्या चेहऱ्यावर ते कधी दिसत नाही. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे तिचे म्हणणे आहे. मला भविष्यात डाॅक्टरच व्हायचे आहे.

- समर्थ अतुल ताठे

............

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे सर्वच ठिकाणी हाहाकार उडाला आहे. अशा स्थितीत रुग्ण डाॅक्टरांकडे नाही तर कुठे जाणार? माझे बाबा डाॅक्टर असून, या काळात त्यांच्या कामाचे तास वाढले आहेत. ते सतत रुग्णांची इमानेइतबारे सेवा करीत आहेत. मी पण भविष्यात डाॅक्टरच होणार.

- आदित्य शिवाजी सावळे

.................

कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मला अधिक वेळ दवाखान्यात राहावे लागणार असल्याचे बाबांनी सांगितले आहे. घरी आल्यानंतर मात्र ते माझ्यासोबत खेळतात, मला भरपूर वेळ देतात. लोकांची सेवा केल्याने देव भरभरून देतो, असे त्यांचे म्हणणे आहे. मी पण भविष्यात त्यांच्यासारखा डाॅक्टरच होणार आहे.

- अभीर प्रवीण ठाकरे

.............

कोट :

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात विशेषत: पोलीस कर्मचारी व डाॅक्टरांच्या कामाचे तास वाढलेले आहेत. ते त्यांच्या मुलांना अधिक वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे मुलांमध्ये चिडचिड निर्माण होणे स्वाभाविक आहे; मात्र मुलांना विश्वासात घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली तर मुले बाबांची घालमेल निश्चितपणे समजू शकतात. कामासोबतच मुलांच्या आवडीनिवडी जपणे आवश्यक आहे.

- डाॅ. नरेश इंगळे

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम