वाशिम :मालमत्तेमध्ये हिस्सा पडेल व आपल्या प्रेमाच्या आड येत असलेल्या सवतीची हत्या प्रेयसी व पहिल्या पत्नीने संगनमत करून केल्याची बाब १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्यामुळे या प्रकरणाणे वेगळेच वळण घेतले आहे. सावंगा जहाँगीर येथील महिलेच्या हत्येप्रकीणी ३0 ऑगस्ट रोजी रूख्मीना पट्टेबहाद्दूर, दिलीप पट्टेबहाद्दूर व त्यांचा जावई प्रकाश हरिभाऊ गायकवाड यांना अटक केली होती. या तिघांची ठाणेदार परदेशी यांनी कसून चौकशी केली असता घटनेला नवीनच वळण प्राप्त झाले. या चौकशीमध्ये दिलीपची पत्नी रूख्मीना व त्याच्या प्रेयसीने हत्या केल्याचे समोर आले. दिलीपने एक पत्नी व प्रेयसी असताना दुसरा विवाह करण्याचे कुठलेच कारण नव्हते. दिलीपच्या संसारात आधीच प्रेमाचा त्रिकोण होता. या प्रेमाच्या त्रिकोणाचा दिलीपने आठवडाभरापुर्वी चौकोन केला. नेमकी हिच बाब पत्नी व प्रेयसीच्या जिव्हारी लागली. या दोघींनी मिळून सागरच्या हत्येचा कट रचला. शेतातील एका विहीरीवर पाणी पिण्याचे कारण समोर करून प्रेयसीने मृतक सागरला विहीरीत ढकलून दिले. त्यानंतर दिलीपच्या पत्नीने मृतक सागर हिच्या डोक्यात मोठमोठे दोन-तीन दगड टाकले. त्यात तिचा जीव गेला.
महिला हत्येच्या कटामध्ये पत्नीसह प्रेयसीचा सहभाग
By admin | Updated: August 2, 2014 23:07 IST