वाशिम: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारूच्या नशेमध्ये पतीने पत्नीला मारहाण केली. याशिवाय या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने २८ मार्चला शहर पोलिसात तक्रार दिली. वाशिम शहरात वास्तव्यास असलेला पराग रामचंद्र राजे यांनी पत्नीला पाच महिन्यांपूर्वी मारहाण केली. तेव्हापासून मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचा आरोप पीडित पत्नीने केला.
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण
By admin | Updated: March 29, 2016 02:21 IST