वाशिम : काेराेना लसीचा पहिला डाेस वेगळा आणि दुसरा डाेस वेगळा घेतला तरी त्याचा विपरित परिणाम हाेणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत तज्ज्ञ डाॅक्टर्सशी चर्चा केली असता काेराेना लसीचे काॅकटेल केले तर अपेक्षित परिणाम हाेणार नसल्याचे मत व्यक्त केले.
जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख २७ हजार ४१७ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ९४,०२४ ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षीय ८९,३८८, तर १८ ते ४४ वर्षांतील ७ हजार ३२० जणांचा समावेश असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. १८ ते ४४ वयाेगटांतील नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला नाही.
काेराेनाला हरविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने देशभरात सध्या लसीकरण माेहीम जाेरात सुरू आहे. परंतु काही ठिकाणी लसीचा पुरवठा हाेत नसल्याने लसीकरण माेहिमेत अडथळाही हाेत आहे. काॅकटेल लसीमुळे अपेक्षित परिणाम हाेत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी जिल्ह्यात काॅकटेल लस काेणालाही देण्यात आली नाही. काॅकटेल लस घेतल्यास दुष्परिणाम हाेणार नसला तरी शरीरात म्हणाव्या त्या प्रमाणात अँटीबाॅडीज तयारही हाेणार नाहीत. यामुळे काेराेना लसीचा पहिला डाेस वेगळा आणि दुसरा डाेस वेगळा न घेणेच बरे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
..................
वाशिम जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या लस देण्यत आली नाही
वाशिम जिल्ह्यात ज्या व्यक्तीने जी लस घेतली त्याचाच दुसरा डाेस देण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तरी असा प्रकार आढळून आला नसल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.
... जिल्ह्यात लसीकरण माेहीम गांभीर्यपूर्वक राबविण्यात येत असून, नागरिकांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. काेराेनावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याची जनजागृती करण्यात येत आहे.
.............
काेराेनाचा प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस ज्या कंपनीचा घेतला आहे त्याच कंपनीचा दुसरा डाेस दिलेल्या वेळेत घ्यावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित आहेत. त्यामुळे काेणालाही वेगवेगळी लस देण्यात येत नाही. तसेच अद्याप काेणी मागितली सुद्धा नाही. वेगवेगळी लस घेतल्यास त्याचा विपरित परिणाम हाेत नाही परंतु अपेक्षित परिणाम सुद्धा हाेणार नाही.
... डाॅ. मधुकर राठाेड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
..................
लस घेतल्याशिवाय काेराेनावर पर्याय नाही. लस घेतलेल्या व्यक्तीचे मृत हाेण्याचे प्रमाण शून्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येकाने आधी घेतललेली लसीचाच दुसरा डाेस घ्यावा कारण यामध्ये बदल केल्यास अपेक्षित परिणाम जाणवणार नाही.
... डाॅ. अनिल कावरखे
...............
लसीचा तुटवडा आहे म्हणून दुसरी लस घेणे किंवा यापेक्षा ती लस चांगली म्हणून त्यात बदल करणे यामुळे अपेक्षित परिणाम हाेणार नाहीत. शरीरात पाहिजे त्या प्रमाणात अँटिबाॅडीज तयार हाेणार नाहीत. त्याकरिता आधी जी लस घेतली तीच लस घेऊन काेराेनापासून बचाव करावा
डाॅ. लक्ष्मीकांत राठाेड
...................