शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांची आतषबाजी करून मुलीच्या जन्माचे स्वागत; करंजीत साजरा झाला आनंदोत्सव

By सुनील काकडे | Updated: June 8, 2023 17:30 IST

मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही घटलेलाच आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासनस्तरावरून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे.

सुनील काकडेवाशिम : मुलगी जन्माला आल्याने तिचे स्वागत जंगी व्हायला हवे, अशी तिच्या आईची इच्छा माहेरच्यांनी पूर्ण केली. प्रसूती झाल्यानंतर दवाखान्यातून घरी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून नवजात मुलगी व तिच्या मातेचे हर्षोल्लासात स्वागत झाले. करंजी (ता.मालेगाव) येथे बुधवारी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही घटलेलाच आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासनस्तरावरून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे. याशिवाय स्त्री जातीच्या अर्भकाची गर्भातच हत्या करण्याचा प्रकार कायमचा संपविण्याच्या उद्देशाने गर्भलिंगनिदान चाचणीवर सक्तीने बंदी असलेल्या कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. तरीदेखील वंशाला दिवाच हवा, असा अट्टहास असलेल्या काही कुटूंबात छुप्या पद्धतीने स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार आजही घडतच आहे. दुसरीकडे मात्र लेकीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करणारे देखील याच समाजातच वावरत असल्याची प्रचिती करंजीतील नागरिकांना अनुभवता आली.  

गोहगाव (ता.रिसोड) हे सासर आणि करंजीत माहेर असलेल्या सारिका स्वप्निल हाडे हिची प्रसूती वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात झाली. मुलगी जन्माला आल्याचे समजताच सारिकाने तिचे स्वागत जंगी व्हावे, अशी इच्छा भाऊ प्रदिप लहानेजवळ व्यक्त केली. वडिल डिगांबर लहाने यांनी त्यास नुसती परवानगीच दिली नाही; तर त्यांच्यासह अख्खे कुटूंब सारिका व तिच्या नवजात लेकीचे स्वागत करण्याच्या तयारीत गुंतले.मायलेकींचे झाले अभुतपूर्व स्वागतदोघी मायलेकी घराच्या उंबरठ्यावर येताच फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत तथा पुजन व औक्षण करून दोघींचेही अभुतपूर्व स्वागत करण्यात आले. हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी करंजीतील महिला-पुरूषांसह मुलामुलींनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.