वाशिम, दि. १५ - शहरात गुरुवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी लाल मियॉ दग्र्याजवळ मुस्लीम बांधवांकडून विसर्जन मिरवणुकीमधील गणेश मंडळातील कार्यकर्ते व भक्तांचे स्वागत करून समाजासमोर आदर्श ठेवला. हिंदू धर्मियांच्या सण, उत्सवात मुस्लीम बांधव सहभागी होण्याची प्रथा अलिकडच्या काळात रुजत असल्याचे दिसते. तथापि, प्रत्यक्ष धार्मिक सण, उत्सवाच्या काळात मुस्लीम बांधव आणि हिंदू बांधव एकत्र येण्याची उदाहरणे अगदी दुर्मिळ आहेत. असेच एक दुर्मिळ उदाहरण गुरुवारी वाशिम शहरात पाहायला मिळाले. १0 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या समाप्तीनिमित्त नित्याप्रमाणे बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. आता या मिरवणुकीत काही खोडकर व्यक्तींच्या चुकांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नव्हती. त्यातच मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला. शहरातील लाल मियॉ दग्र्याजवळ मुस्लीम बांधवांनी त्या ठिकाणी येणार्या पहिल्या अर्थात शिवशंकर गणेश मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव रंगभाळ यांचा नगर परिषद उपाध्यक्ष, तसेच लाल मियॉ दग्र्याचे हाजी मोहम्मद जावेद यांनी शाल व नारळ देऊन स्वागत केले. यावेळी ठाणेदार रवींद्र देशमुख, कादरभाई, रोशन ठेकेदार, रशिदभाई, इब्राहीम खतिब, मोहम्मद युसूफ, सुभानभाई, मोहम्मद मुसिफ, तौकिफ ठेकेदार यांच्यासह माधवराव अंभोरे, विसर्जन समितीचे नितिन पगार, नितिन उलेमाले, रवींद्र पेंढारकर, कपिल सारडा, जय ढवळे, सुनील तापडिया आदींसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती.
दग्र्याजवळ मुस्लीम बांधवांकडून गणेश भक्तांचे स्वागत
By admin | Updated: September 16, 2016 03:03 IST