शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावे पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:09 IST

तळप बु.:  तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण २८ गावे पाणी पुरवठा याजेनेची थकीत पाणीपट्टी वसुली करण्याबाबत मजीप्राकडुन कठोर उपाय योजना केल्या जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेही थकीत पाणी पट्ीचे कारण दाखवुन यापूर्वी एकदा ही पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली होती.

ठळक मुद्देथकीत पाणीपट्टीउपाय योजना करा

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम):  तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण २८ गावे पाणी पुरवठा याजेनेची थकीत पाणीपट्टी वसुली करण्याबाबत मजीप्राकडुन कठोर उपाय योजना केल्या जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेही थकीत पाणी पट्ीचे कारण दाखवुन यापूर्वी एकदा ही पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली होती.तळप बु. सह मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्याच्या उद्देशाने सन २००५ मध्ये मजीप्राची २८ गावे पाणी पुरवठा योजना असित्वात आली.परंतु खरच आज रोजी या २८ गावातील पाणी समस्या निकाली निघाली का? हा मात्र प्रश्नच आहे. २८ गावाकरिता अस्तित्वात असलेली ही योजना आज रोजी एकुण १४ गावापुरतीच मर्यादीत झाली आहे. आणि या १४ गावातील ही पाणी पुरवठा १ आॅक्टोंबर पासुन बंद करण्याचे पत्र मजीप्राने  संबंधीत ग्रामपंचायतींना दिले असल्याने कधीही योजना बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकाकडून पाणीपट्टी वसुली होत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु ही पाणीपट्टी  वसुल व्हावी अशी मजीप्राची  इच्छाच नाही. तळप बु. हे गाव सुध्दा २८ गावे पाणी पुरवठा  योजनेमध्ये समाविष्ट आहे. येथे अनेक नळ ग्राहकाकडे दोन दोन वर्षापासून पाणी पट्टीची थकीत रक्कम आहे. अनेकांचे अवैध नळ कनेक्शन  आहेत, मात्र  त्यावर मजीप्राकडून कारवाई केल्या जात नाही. परिणामी मजीप्राच्या गलथान कारभारामुळे व नागरिकांच्या पाणीपट्टी न भरण्याच्या वृत्तीमुळे ही चांगली व आवश्यक असलेली योजना बंद पडत आहे. मजीप्राने  स्थानिक ग्रामपंचायती तेथील  पाणी पुरवठा  समित्या सोबत घेवुन पाणीपट्टी वसुलीकरिता कठोर उपाय योजना,करणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यातील २८ गावाकरिता वरदान असलेली ही योजना कायमची बंद पडणार हे मात्र निश्चित आहे.