शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती सप्ताह उरला नावापुरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 12:13 IST

Washim News प्रचारकार्यासाठी निधीच मिळत नसल्याने विशेष असे कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो; मात्र वाशिम जिल्ह्यात गतवर्षीपासून हा सप्ताह केवळ नावापुरताच साजरा होत असून, जनजागृतीपर कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे दिसत आहे. शासन स्तरावरून प्रचारकार्यासाठी निधीच मिळत नसल्याने विशेष असे कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सांगितले. दरवर्षी उद्भवणारा पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता, पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्रोत, नद्या आणि जलाशयांचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधीचे कायदे आणि नियमांचे पालन करण्याबाबत समाजात जागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने २२ मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक जलदिनानिमित्त दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाने ९ मार्च २०१६ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयाव्दारे दिले होते. या सप्ताहादरम्यान जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र शासन निर्णय पारित झाला, तेव्हापासून केवळ एक वर्ष तत्कालिन कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जलजागृती सप्ताह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शासनाने बाळगलेल्या मूळ उद्देशालाच तडा जात असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी मार्च महिन्यातच कोरोना विषाणू संसर्गाची सुरूवात झाली होती. त्यामुळे जलजागृती सप्ताहांतर्गत कुठलेही उपक्रम राबविण्यात आले नाहीत. यावर्षीही तशीच परिस्थिती असून, गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम घेण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. शिवाय निधीची तरतूद नसल्याने प्रचारकार्य अशक्य ठरत आहे.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा, वाशिम