शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ध्वनी प्रदूषणा’वर पथकाचा ‘वॉच’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:11 IST

वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकाºयांची नियुक्ती केली असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी व समितीला द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिका-यांची नियुक्ती जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकाºयांची नियुक्ती केली असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी व समितीला द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी केले.विविध प्रकारे ध्वनी प्रदुषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ध्वनी प्रदुषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून नियंत्रण प्राधिकारी तसेच सनियंत्रण समिती स्थापन केली आहे.ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियांका मीना, वाशिम शहराचे ठाणेदार विजय पाटकर, वाशिम ग्रामीणचे ठाणेदार सुनील अंबुलकर, रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील, मालेगावचे ठाणेदार एस. एच. नाईकनवरे, शिरपूरचे ठाणेदार हरीष गवळी, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, मंगरूळपीरचे ठाणेदार आर. बी. जायभाये, अनसिंगचे ठाणेदार गणेश भाले, आसेगावचे ठाणेदार विनायक जाधव, जऊळकाचे ठाणेदार आर. जी. शेख, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहरचे ठाणेदार एम. एम. बोडखे, कारंजा ग्रामीणचे ठाणेदार गजानन गुल्हाणे, मानोराचे ठाणेदार आर. एन. मळगणे, धनजचे ठाणेदार शिशिर मानकर या पोलीस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे असून गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक के. एच. धात्रक हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक १०० या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देता येणार आहे. ध्वनी प्रदुषण होत असल्यास नागरिकांनी उपरोक्त संपर्क क्रमांक तसेच अधिकाºयांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.