शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 15:52 IST

वाशिम - जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेतली जात आहे. या केंद्रांवर विशेष वॉच ठेवला जाणार आहे.आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी होत ...

वाशिम - जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेतली जात आहे. या केंद्रांवर विशेष वॉच ठेवला जाणार आहे.

आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापविले आहे. प्रचाराचा उडत असलेला धुराळा ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळनंतर आचारसंहितेमुळे ‘शांत’ होणार आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या कामात उमेदवार व्यस्त असल्याचे दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये म्हणून जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्रांची चाचपणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या मतदान केंद्राबाहेर कुणालाही थांबू न देणे, चित्रिकरण करणे यासह इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत.