शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनी बीडीओं’चा ग्रामपंचायतींवर ‘वॉच’

By admin | Updated: May 24, 2017 01:56 IST

जिल्हा परिषद सर्कलनिहाय ५१ मिनी बीडीओ : दर बुधवारी घेणार ग्रामसेवकांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायतींच्या कामकाजावर देखरेख व कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सर्कलनिहाय मिनी बीडीओंची नियुक्ती प्रक्रिया पुर्णत्वाकडे नेली आहे. कार्यरत विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, पर्यवेक्षक आदी अधिकाऱ्यांनाच मिनी बीडीओचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा, शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, लोकांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने व्हावा, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांचा आढावा जिल्हा परिषद सर्कल स्तरावर घेता यावा, आदी दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने ‘सर्कलनिहाय मिनी बीडीओ’ या संकल्पनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ५१ जिल्हा परिषद सर्कल असून, प्रत्येक सर्कलला एक याप्रमाणे ५१ मिनी बीडीओंची नियुक्ती करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिनस्त कार्यरत विस्तार अधिकारी संवर्गातील सर्व कृषी अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), आरोग्य पर्यवेक्षक व इतर संबंधित संवर्गातील अधिकाऱ्यांना मिनी बीडीओचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी नऊ आणि कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात प्रत्येक आठ असे एकूण ५१ मिनी बीडीओ ४९१ ग्रामपंचायतींच्या कामकाजावर वॉच ठेवणार आहेत. त्या-त्या सर्कल क्षेत्रात विविध योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्याचे अधिकार मिनी बीडीओला देण्यात आले आहेत. प्रशासकीय व आर्थिक अधिकार वगळता अन्य सर्व प्रकारचे अधिकारही मिनी बीडीओंना मिळाले आहेत.