वाशिम: शहरातील वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी निर्माण करण्यात आलेला येथील बायपास रस्ता रेल्वे पुलाअभावी केवळ शोभेची वास्तु बनला आहे. अकोल्यावरून हैद्राबादकडे जाणारा महामार्ग वाशिम शहरामधून जातो. वाढणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी शासनाने अकोला मार्गावरील पाटील ढाब्याजवळून नवीन बायपास रस्ता निर्माण केला आहे. हा वळण रस्ता पूर्णपणे शहराबाहेरून जात असून, पुसद मार्गावरील जागमाथा परिसरात मुख्य मार्गाला मिळतो. बायपास मार्गाचे काम पुर्ण झाले असले तरी रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी आवश्यक असलेला पूल बांधण्यात रेल्वे व बांधकाम विभागातील समन्वयाचा अभाव अडथळा ठरत आहे.
वाशिमचा बायपास बनला शोभेची वास्तु !
By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST