शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

वाशिमवासीयांचा घसा ‘जाम’

By admin | Updated: July 29, 2014 21:02 IST

रूग्णांमध्ये वाढ: सर्दी,खोकला व तापाचे थैमान

वाशिम : ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे वाशिमवासीयांचा घसा जाम झाला आहे. गत तिन-चार दिवसांपासून पुण्यात सर्दी खोकला व तापाने थैमान घातले आहे. परिणामी, दखान्यातही रूग्णांची संख्या वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयेही हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.** जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात आल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत. कधी पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाळ्यालाही लाजवेल असे उन अश्या बदलत्या वातावरणामुळे हवेतील विषाणूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आणि याच विषाणूंनी सद्या वाशिमवासीयांवर हल्ला केला आहे. ** प्रामुख्याने हवेतून आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणार्‍या या विषाणूंमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, घसादुखी, उलटी, जुलाब या आजारांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णसंख्येवरून ही बाब दिसून येत आहे.** गत चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळेही सर्दी . खोकला, अंगदुखी, पाठदुखी व तापाच्या रूग्णात एकदम वाढ झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास हे आजार तात्काळ बरे होऊ शकतात. ** पावसाळ्याच्या दिवसात आजारांपासून बचाव करण्यासाठी गाळलेले पाणी प्या, बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा, आंबलेले पदार्थ खाऊ नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.** ऋतु बदलला , आहारही बदलासद्या उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाळी आहार बदलून पावसाळी आहार घेण्याकडे वळायला पाहीजे. याला ऋतु संधी असे म्हणतात. उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात घैत असलेली शरबते, थंडपेये, आईस्किम हळूहळू कमी करून गरम पदार्थ म्हणजेच सूप, वरण, आदी पचायला सोपे जाणारे हलके पदार्थ सेवणास सुरूवात करावी त्याच बरोबर उष्ण तिष्ण असलेले सुंठ ,तुळस, काळी मिरी, लवंग या पदार्थांचा आहारातील वापर वाढवावा. असा सल्ला डॉ. पाटील यांनी यावेळी दिला आहे.** राहा तुळशीच्या सानिध्यातआगामी काळात शहरात डेंगीची साथ पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. डेंगीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ तुळशीचे झाड लावले पाहीजे. तुळस २४ तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणार्‍या व्यक्तिंना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन रक्ताभिसरण वाढेल आणि डेंगीचा आजर होण्यासाठी प्रतिबंध होईल असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.** सर्दी खोकला घालवा काढा पिऊनसद्या शहरातच नव्हे तर जिल्ह्यात सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. यातील बर्‍याच रूग्णांना घरच्या घरी काही प्रमाणात या आजारांला प्रतिबंध घालता येऊ शकतो. बेल, तुळस, काळीमिरी, लवंग, दालचिनी, सुंठ ठेचून रात्रभर ४ कप पाण्यात ठेवा सकाळी हे पाणी उकळून त्याचा एक कप काळा करा. आणि त्यामध्ये गुळ घालुन गरम गरम प्या. सर्दी व खोकला कमी होऊन उत्साह दिवसभरासाठी टिकून राहील. या शिवाय पावसात भिजणे, केस ओले ठेवणे , भिजलेले कपडे अंगावर जास्त वेळ ठेवणे आदी बाबीही प्रकर्षाने टाळा असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.