शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लेमिंगो’च्या पसंतीला उतरले वाशिमचे एकबुर्जी!

By admin | Updated: November 11, 2015 01:50 IST

पक्षिमित्रांना पर्वणी ; वाशिमला सहा महिन्यांचा मुक्काम.

सुनील काकडे / वाशिम : देशाच्या पश्‍चिमेकडे असलेल्या गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात प्रजननप्रक्रिया आटोपल्यानंतर हिवाळ्याच्या दिवसांत खाद्याच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करणारा ह्यफ्लेमिंगोह्ण पक्षी वाशिममधील एकबुर्जी प्रकल्पावर सहा महिन्यांच्या मुक्कामाला येतो. विदर्भातील एकमेव एकबुर्जी प्रकल्प हे या पक्ष्याचे आवडते स्थळ असून, लवकरच पक्षिमित्रांना फ्लेमिंगोचे बारकाईने निरीक्षण करण्याची पर्वणी मिळणार आहे. वाशिमचे पक्षिवैभव अत्यंत समृद्ध आहे. येथे अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. विशेष म्हणजे, वाशिम शहर परिसर विदेशातून भारतात स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांच्या सरळ रेषेवर असल्यामुळे येथे अनेक दुर्मीळ स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. वाशिममध्ये तणमोर हा दुर्मीळ पक्षी आढळतो. वाशिम जिल्ह्यात युरोप, सायबेरिया, मंगोलिया यांसह विविध देशांतून अनेक पक्षी स्थलांतर करतात. यामध्ये प्रामुख्याने विदर्भात कुठेच वास्तव्य न करणारा फ्लेमिंगो हा पक्षी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पावर हिवाळ्यातील नोव्हेंबर ते एप्रिल असे सहा महिने वास्तव्याला असतो. गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात प्रजननप्रक्रिया आटोपल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईची खाडी, पैठण येथील जायकवाडी धरण तसेच पुणे जिल्ह्यातील उजनी धरणावर फ्लेमिंगो हा पक्षी हजारोंच्या संख्येने वास्तव्याला असतो. सोबतच विदर्भातील एकमेव वाशिम येथील एकबुर्जी प्रकल्पावरही याच काळात त्याचे वास्तव्य असते. एकबुर्जीवर गतवर्षी सुमारे १५६ फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद घेण्यात आली होती.