शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद सभांचा खर्च ४0 लाखांवर!

By admin | Updated: March 24, 2016 02:46 IST

सार्वजनिक मालमत्ता परिरक्षणावर १.४२ कोटींचा खर्च : कृषीसाठी केवळ ६0 लाखांचा खर्च.

संतोष वानखडे /वाशिममिनी मंत्रालय असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या विविध सभा, सभेस हजर राहण्यासाठी व सदस्यांना प्रवास भत्ता, कायम प्रवास भत्ता, अल्पोपाहार आदी बाबींवर सन २0१५-१६ या दुष्काळी वर्षात ३९ लाख ९१ हजार रुपये खर्च झाल्याची बाब अंदाजपत्रकातून समोर आली आहे. दुसरीकडे याच वर्षात कृषी विभागाच्या योजनांवर केवळ ६0 लाखांचा खर्च झाला.सन २0१५-१६ च्या सुधारित अंदाजपत्रकात कोणत्या घटकांवर किती खर्च झाला, या आकडेवारीवर नजर टाकली असता, शिक्षणावर ८0 लाखांचा खर्च झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक आरोग्य या घटकावर ७0 लाखांचा खर्च दाखविण्यात आला. शिक्षण व आरोग्य या प्रमुख विषयांचा एकत्रित विचार केला तर दीड कोटींचा खर्च झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण या लेखाशीर्षाखाली तब्बल १ कोटी ४२ लाख 0२ हजार ६३५ रुपये खर्च झाल्याचे अंदाजपत्रकात दाखविण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कृषीवर सन २0१५-१६ या वर्षात फक्त ६0 लाखांचा खर्च झाला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात बहुतांश सदस्य शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरतात. शेतकर्‍यांसाठी २0 ते ३0 लाखांची तरतूद करण्याच्या मागणीसाठी अख्खे सभागृह दणाणून सोडतात. २0१५ या वर्षातील भीषण दुष्काळी परिस्थितीचे वर्णन करून शेतकरी हिताच्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्याचा प्रश्न लावून धरला जातो. तथापि, या प्रश्नांना म्हणावा तसा ह्यअर्थह्ण मिळत नसल्याचा आरोपही सदस्यांमधूनच होतो. २0१५-१६ या वर्षात ६0 लाख आणि २0१६-१७ या वर्षात २0 ते ३0 लाखांचा खर्च ह्यकृषीह्णवर अपेक्षित आहे.