शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम पालिकेचा ‘नागरी गौरव’ 

By admin | Updated: May 4, 2017 19:36 IST

उल्लेखनिय कामगिरीबाबत सन्मानपत्र व ३ कोटी रुपयांचा धनादेश देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ४ मे रोजी गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३ कोटी रुपयांचा धनादेश प्रदान : अमरावती विभागात उल्लेखनिय कामगिरीवाशिम : नागरी गौरव २०१७ अंतर्गत नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतिने अमरावती विभागात आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशिल ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबाबत सन्मानपत्र व ३ कोटी रुपयांचा धनादेश देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ४ मे रोजी गौरव करण्यात आला.नागरी गौरव २०१७ अंतर्गंत वाशिम नगरपरिषदेने अमरावती विभागात उल्लेखनिय कामगिरी करुन आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशिल ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नगराध्यक्ष अशोक हेडा यांना नागरी गौरव २०१७ सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन कोटी रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र मुख्याधिकारी गणेश शेटे व नगराध्यक्ष अशोक हेडा यांना देवून सन्मानित केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. वाशिम नगर परिषदेने शहरी भागातील स्वच्छ भारत अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून भूमिगत गटार योजना, नवीन पाणीपुरवठा योजना, करवसूली, अपंग कल्याण दुर्बल घटक योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींकरिता राबविण्यात आलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना यासह इतरही कामांमध्ये उल्लेखनिय कार्य केले आहे. एकूणच या सर्व कामांचे शासनाने योग्यरित्या मुल्यमापन करून वाशिम नगर पालिकेला अमरावती विभागातून उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार जाहीर केला व  त्याचे वितरण मुंबई येथे ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.