शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

वाशिम जिल्हा ९२.५२ टक्क्के निकालासह विभागात तिसर्‍या स्थानावर

By admin | Updated: June 4, 2014 01:24 IST

बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्हा ९२.५२ टक्के निकालास अमरावती विभागात तिसर्‍या स्थानावर आला आहे.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्हा ९२.५२ टक्के निकालास अमरावती विभागात तिसर्‍या स्थानावर आला आहे. मागील वर्षी जिल्हय़ात ८५.२५ टक्के निकालासह विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. एकीकडे निकालाची टक्केवारी ८५.२५ टक्केवरून ९२.५२ एवढी वाढली असताना मागील वर्षी विभागात प्राप्त केलेल्या प्रथम स्थानावरून जिल्हय़ाची पीछेहाट झाली आहे. जिल्हय़ात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी ११ हजार ७७१ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ७६0 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १0 हजार ८८0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ९२.५२ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५९८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ५२७६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७९२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, २१४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १0 हजार ८८0 विद्यार्थ्यांमध्ये ६३४९ मुले व ४५३१ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.३१ तर मुलींची टक्केवारी ९४.२६ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. जिल्हय़ात विज्ञान शाखेचा निकाल ९६.६४ टक्के, कला शाखेचा ८९.९८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.८0 टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८४.४0 टक्के निकाल लागला आहे. १३ शाळांचा निकाल १00 टक्के निकाल लागला आहे. कारंजा तालुक्याचा निकाल जिल्हय़ात सर्वाधिक ९४.३२ टक्के लागला आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्याचा ९३.६९ टक्के, रिसोड तालुक्याचा ९२.२६ टक्के, मंगरुळपीर तालुक्याचा ९१.९७ टक्के, मानोरा तालुक्याचा ९0.७२ टक्के, तर मालेगाव तालुक्याचा ९0.४३ टक्के निकाल लागला आहे. निकालात वाशिम तालुक्यात नाव नोंदणी केलेल्या १६८४ मुले व ११२५ मुलींपैकी १५६१ मुले व १६६५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची टक्केवारी ९२.९२ टक्के, तर मुलींची टक्केवारी ९४.८४ टक्के आहे. मालेगाव तालुक्यात नाव नोंदविलेल्या ८८३ मुले व ५७२ मुलींपैकी ७७८ मुले व ५२५ मुली उत्तीर्ण झाल्या. या तालुक्यास उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.२४ तर मुलींची टक्केवारी ९२.२७ टक्के आहे. रिसोड तालुक्यात परीक्षेसाठी १७७५ मुले व १00६ मुलींनी नाव नोंदणी केली होती. या तालुक्यात यापैकी १६२४ मुले व ९४0 मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.५४ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.५३ टक्के आहे. कारंजा तालुक्यात परीक्षेसाठी ९६९ मुले व ९१४ मुलींनी नावनोंदणी केली. त्यापैकी ८९३ मुले व ८८३ मुली उत्तीर्ण झाली. तालुक्यात उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.१६ तर मुलींची टक्केवारी ९६.६१ आहे. मंगरुळपीर तालुक्यात ९५९ मुले व ७७२ मुलींनी नाव नोंदणी केली होती. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९0.५१ तर मुलींची ९३.७८ टक्के आहे. मानोरा तालुक्यात परीक्षेसाठी ६९0 मुले व ४२२ मुलींनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ६१५ मुले व ३९३ मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. या तालुक्यात उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.३९ तर मुलींची ९२.८९ टक्के एवढी आहे.