शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ात २५0 रोहित्र नादुरुस्त!

By admin | Updated: October 17, 2016 02:10 IST

महावितरणची हलगर्जी; सर्वसामान्यांसह शेतकरी हैराण.

वाशिम, दि. १६- जिल्हय़ात आजमितीस विविध कारणांमुळे तब्बल २५0 रोहित्र नादुरुस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीदेखील हैराण झाले आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे उद्भवलेली ही समस्या तत्काळ निकाली काढा, अशी मागणी जोर धरत आहे.गावठाण फिडरवरील तसेच शेतीला वीजपुरवठा करणार्‍या फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार गत अनेक दिवसांपासून वाढीस लागले आहेत. निर्माणाधीन वीज उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांमुळे कार्यान्वित असलेल्या रोहित्रांवर अतिरिक्त विजेचा भार पडत असल्यानेच ही समस्या उद्भवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हय़ात इन्फ्रा-२ या योजनेंतर्गत ५ वीज उपकेंद्रांची कामे होणार होती; मात्र त्यापैकी २ वर्षाच्या काळात तीन वीज उपकेंद्रच उभे राहू शकले. तेही विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या प्रकारामुळे वीजपुरवठय़ात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी, गावठाण फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागले असून यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. तथापि, हिंदू संस्कृतीतील सर्वांत मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महावितरणने नादुरुस्त असलेले रोहित्र बदलण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.