वाशिम : वाशिमचा सुपुत्र असलेल्या महाकवी गुणाढय़ यांनी दोन हजार वर्षांपूर्वी ह्यबृहतकथाह्ण हा कथासंग्रह लिहून ह्यकथाह्ण या साहित्यप्रकाराला जन्म दिला. त्यामुळे वाशिम हे कथा साहित्याचे जन्मस्थान आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सहकार्याने ह्यमहाकवी गुणाढय़ नगरीह्णमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी हे होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. किरणराव सरनाईक, भाऊसाहेब सोमटकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. नरके पुढे म्हणाले, महाकवी गुणाढय़ यांचा जन्म वाशिम येथे झाला. वत्स व गुल्मक हे महाकवी त्यांचे मामा होते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची या भाषेत सुमारे ७0 लाख ोकांचे लेखन केले होते. त्यापैकी आता केवळ १0 लाख ोकांचा समावेश ह्यबृहतकथाह्ण या कथासंग्रहात असून, याचे पाच खंड आहेत. यासोबतच ह्यपंचतंत्रह्ण, ह्यसिंहासन बत्तिशीह्ण यासारख्या सुप्रसिद्ध कथांचे लेखनही त्यांनी केले आहे. या कथांमधून त्यांनी नीतीमत्ता, बोध, शिक्षण, ज्ञान याची मांडणी केली आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीही मराठी भाषा किती समृद्ध व संवेदनशील होती, याची प्रचिती येते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची भाषेत लिहिलेल्या या लेखन साहित्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे मतही यावेळी प्रा. नरके यांनी व्यक्त केले.
वाशिम हे जागतिक कथा साहित्याचे जन्मस्थान
By admin | Updated: February 17, 2015 01:40 IST