शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : आदेशानंतरही ‘आधार’ची कामे बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:04 IST

आदेशही २० दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; परंतु अद्याप ही कामे सुरू झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्तीसह अद्ययावतीकरणाचे काम करणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचे कामकाज शासनाने थांबवत ही जबाबदारी ‘महाआयटी’ या कंपनीकडे दिली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ही कामे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसे आदेशही २० दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; परंतु अद्याप ही कामे सुरू झाली नाही. त्यात महाआॅनलाईन कंपनीकडून जमा करून घेतलेल्या काही आधार किट नादुरुस्त असल्याने ‘आधार’ची कामे कधी सुरू होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या १८ मार्च २०२० च्या आदेशानुसार जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केंद्र) बंद ठेवण्यात आले होते. आता नागरिकांना आपले विविध शासकीय, तसेच इतर महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आधार नोंदणी व आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाºयांनी १७ मे रोजी या संदर्भात आदेश पारित करून आधार नोंदणी सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. विशेषत: ग्रामीण भागांतील नागरिकांना यासाठी शहरात येण्याची गरज भासू नये म्हणून प्रामुख्याने ग्रामीण भागांतीलच केंद्र सुरू करण्याचेही या आदेशाद्वारे सुचविण्यात आले होते.तथापि, आता दोन महिने उलटून गेले आणि जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले असले तरी, ही कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. या कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या महाआयटी कंपनीने महाआॅनलाईनकडून जिल्हा प्रशासनाने जमा करून घेतलेल्या आधार किट अद्याप केंद्र संचालकांना वितरीत करण्यासाठी हस्तांतरीत करून घेतलेल्या नसून, त्यातील बहुतांश मशीन नादुरुस्त असल्याची माहितीही मिळाली आहे. या सर्व कारणांमुळे आधार नोंदणी आणि आधार दुरुस्तीअभावी कामे प्रलंबित असलेल्या नागरिकांची मोठी ससे होलपट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या प्रक्रियेत असलेन्या सर्व अडचणी दूर करून जिल्ह्यात तातडीने आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे प्रशासनाने सुरु करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी आधार नोंदणीची प्रतिक्षा करणारे जिल्हाभरातील हजारो नागरिक करीत आहेत.‘महाआयटी’च्या परिक्षेचीही अडचणजिल्हाधिकाºयांनी १७ मे रोजी मंगरुळपीर तालुक्यातील कन्टेंनमेंट झोनमधील कवठळ वगळता इतर ग्रामीण भागांत आधार नोंदणीच कामे करण्याचे, तर २२ मे रोजी शहरी भागांतही आधार नोंदणीची कामे सुरू करण्याचे आदेश पारित करूनही ३१ मे पर्यंतही आधार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू न झाले नाही. दरम्यान, आधार नोंदणीचे काम करणाºयांना आधार किट देण्यापूर्वी महाआयटीकडून त्यांची परिक्षा घेण्यात येते. ही परिक्षा दिल्यानंतर संबंधिताकडून ५० हजार रुपये अनामत रकमेच्या आधारे आधार किट दिली जाते; परंतु गत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही परिक्षा घेणेही शक्य नाही. त्यामुळेही काही ठिकाणी आधार नोंदणी सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे दिसत आहे.जिल्हाधिकाºयांनी १७ मे रोजी कवठळ हे कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी ग्रामीण भागांत, तसेच २२ मे रोजी शहरी भागांतही आधार नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आधार नोंदणी सुरू करण्यात कोणत्याच अडचणी यायला नको.आधार किटच्या उपलब्धतेचा विचार करता पूर्वी काही संचालकांना आधार नोंदणीच्या किट उपलब्धही करून दिल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या उर्वरित आधार किटची पडताळणी करून चालू असलेल्या आधार किट त्यांनी नेण्यास कोणतीही अडचण नाही.

-शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड