शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

ऑडिट न करणा-या संस्थांवर कारवाईची टांगती तलवार!

By admin | Updated: September 22, 2016 01:36 IST

१0८ सहकारी संस्थांचा लेखा परीक्षणाला खो; वरिष्ठांकडे अहवाल सादर होणार.

संतोष वानखडे वाशिम, दि. २१ - सहकार क्षेत्रातील ८0४ पैकी १0८ सहकारी संस्थांनी ह्यऑडिटह्णला खो दिल्याने या संस्थांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची विश्‍वसनीय माहिती हाती आली आहे.अर्थव्यवस्थेला बळकटी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यात सहकारी संस्थांची मोलाची भूमिका आहे; मात्र काही संस्था केवळ नोंदणीपुरत्या र्मयादीत राहत असल्याने कार्यालयीन कामकाजावर या संस्थांचा अतिरिक्त बोजा पडतो. बंदस्थितीत असणार्‍या तसेच कार्यस्थगित सहकारी संस्थांचा शोध घेणे आणि संस्थांची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून संस्थांचे लेखापरीक्षण केले जाते. वाशिम जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी २0१४-१५ चे दोष दुरुस्ती अहवाल लेखा परीक्षकामार्फत संबंधित निबंधकांना सादर करणे व २0१५-१६ चे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात एकूण ८0४ सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण ३१ जुलैपर्यंत करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. या ८0४ संस्थांमध्ये १४ संस्था नवीन असल्याने या संस्थांचे ऑडिट पुढील सत्रात होणार आहे. उर्वरित सर्व संस्थांनी ३१ जुलैपर्यंत ऑडिट करण्याचे बंधन घालून दिले होते. या सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाची जबाबदारी एकूण ३२ अधिकार्‍यांवर सोपविली होती. ३१ जुलैपयर्ंत ५८0 संस्थांचे सन २0१५-१६ चे लेखा परीक्षण कामकाज पूर्ण झाले होते तर जवळपास २५0 संस्थांचे लेखा परीक्षण अहवाल प्राप्त होते. १९0 सहकारी संस्थांनी लेखा परीक्षण केले नसल्याने या संस्थांबाबत अपराध दंडाची नोटीस जारी केली होती. त्यानंतर य संस्थांना लेखा परीक्षण करण्याची मुदत देण्यात आली. २१ सप्टेंबरपर्यंत एकूण ६८२ संस्थांनी लेखा परीक्षण पूर्ण केले असून, उर्वरित १0८ संस्थांनी लेखा परीक्षणाला कोलदांडा दिला. वारंवार मुद तवाढ दिल्यानंतरही या संस्थांनी लेखा परीक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपनिबंधक कार्यालयाने गांभीर्याने घेतला असून, अशा संस्थांविरुद्ध सहकार कायद्यानुसार कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. तसेच सन २0१४-१५ चे दोष दुरुस्ती अहवाल वेळेत सादर न करणार्‍या संस्थांबाबत व शेरे नोंदवून सादर न करणार्‍या लेखा परीक्षकांबाबतदेखील दंडात्मक कारवाई करणे विचाराधीन आहे.