खामगाव : संत गजानन महाराजांच्या पालखी निमित्त काल खामगाव आणि शेगाव पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त बजावला होता. प्रत्येक पोलिसच यावेळी वारकरी झाल्याचे चित्र दिंडी मार्गावर पहायला मिळाले. चोख पोलिस बंदोबस्त बजावण्यासाठी शेगाव आणि खामगावातील ४५0 पोलिस कर्मचारी सतर्क होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत साळुंके, उपविभागीय अधिकारी जी.श्रीधर, ठाणेदार दिलीपसिंह पाटील, ठाणेदार ओमप्रकाश अंबाळकर, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार भागवत फुंदे, शहर वाहतूक निरिक्षक अरविंद राऊत, शेगावचे ठाणेदार डी.डी ढाकणे, विजयकुमार आकोत हे उपस्थित होते.
बंदोबस्तासाठी पोलिस झाले ‘वारकरी’
By admin | Updated: August 4, 2014 00:07 IST