शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वार्डातील कचरा टाकला नगर पालीकेत!

By admin | Updated: July 5, 2017 13:47 IST

कचरा नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या कक्षात व मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोर टाकून आपला रोष व्यक्त केला.

नियोजन सभापतींनी गोळा केला कचरा:  नगरपरिषदेच्या कार्याबाबत केला युवकांनी व्यक्त रोष

वाशिम : शहरात होत असलेला कचरा व उचलण्यासाठी असलेल्या घंटागाडया बंद यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन, नगराध्यक्ष यांना निवेदन देवूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ खुद्द नियोजन सभापती अमित मानकर यांनी युवकांना सोबत घेवून वार्डातील कचरा जमा केला. सदर कचरा नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या कक्षात व मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोर टाकून आपला रोष व्यक्त केल्याची घटना ५ जुलै रोजी १० वाजताच्या दरम्यान घडली. वाशिम शहरातील वार्ड क्रमांक दहाचे नगरसेवक तथा नियोजन सभापती अमित मानकर यांच्या वार्डामध्ये घंटागाडया येत नसल्याने मोठया प्रमाणात कचरा जमा होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने मानकर यांनी नगराध्यक्ष, प्रशासनाकडे  निवेदन देवून घंटागाडी सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाची दखल घेतल्या जात नसल्याने स्वताच्या वार्डासह शहरातील कचरा जमा केला. विशेष म्हणजे यावेळी मानकर यांनी स्वता कचरा घेवून जाणारा ट्रॅक्टर चालविला. नागरिकांनी मानकर यांच्या  उपक्रमाचे कौतूक केले असले तरी विरोधक नियोजन सभाापती यांच्या वार्डातील कचराच उचलण्यासाठी ते सक्षम नाही तर शहराचे नियोजन कश्याप्रकारे करणार यावर बोलतांना दिसून येत आहेत.  विरोधक काहीही चर्चा करीत असले तरी सर्वसामान्य जनतेतून मात्र मानकर यांनी उचलले पावलाबाबत नागरिक समाधान व्यक्त करतांना दिसून  येत आहेत. शहरात फिरत असलेल्या घंटागाडया अनेक दिवसांपासून शहरात फिरत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांची दिसून येत आहे. तसेच घंटागाडयांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. ज्या कंत्राटदााराला घंटागाडयांचे कंत्राट दिले आहे त्यांचे बिलेच काढण्यात न आल्याने शहरातील घंटागाडया बंद असल्याची माहिती आहे. या संदर्भात नगराध्यक्ष अशोक हेडा व नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळून आला.