वाशिम : राज्य शासनाच्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, ज्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत पास घेतला आहे, त्याच व्यक्ती परजिल्ह्यात जाऊ शकणार आहेत तसेच परजिल्ह्यातून जिल्ह्यात येऊ शकणार आहेत. नातेवाइकांच्या अंत्यविधीकरिता अथवा वैद्यकीय कारणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात, परराज्यात जाण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास ऑनलाइन अर्ज केल्यावर अवघ्या काही तासांत मिळू शकेल.
राज्य शासनाने २२ एप्रिलपासून नवे नियम लागू केले आहेत.आता जिल्ह्यात फक्त ज्या व्यक्तींनी प्रशासनाची परवानगी घेतली आहे, त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. आपत्कालीन कारणांसाठीच पास देण्यात येणार आहे. नातेवाइकांच्या अंत्यविधीकरिता अथवा वैद्यकीय कारणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात, परराज्यात जाण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास ऑनलाइन अर्ज केल्यावर अवघ्या काही तासांत मिळू शकेल. पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाच्या कारणासह आणि आवश्यक त्या दोन कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
======================
चौकट
कोणाला मिळू शकेल ई-पास
नातेवाइकांचा अंत्यविधी, वैद्यकीय आणि लग्न समारंभ यासारख्या महत्त्वाच्या कारणासाठी परजिल्ह्यात अथवा पर राज्यात जाण्यासाठी ई-पास दिला जाईल.
=====================
ई-पास काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
- अर्जदार आजारी नसल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र.
- प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डाची प्रत.
====================
ई-पाससाठी या संकेतस्थळावर करा ऑनलाइन अर्ज
covid19.mhpolice.in
---------------------------
या संकेतस्थळावरील असा फॉर्म भरा .
==============
तुमचा जिल्हा / शहर निवडा
संपूर्ण नाव नमूद करा
प्रवास आरंभ करण्याची तारीख नमूद करा
परतीच्या प्रवासाची अंतिम तारीख नमूद करा
मोबाइल क्रमांक नमूद करा
प्रवासाचे कारण (पर्याय निवडा)
प्रवासाच्या वाहनाचा पर्याय निवडा
वाहन क्रमांक नमूद करा
विद्यमान राहण्याचा पत्ता नमूद करा
ई-मेल आयडी नमूद करा
प्रवासाचे आरंभ ठिकाण निवडा
अंतिम प्रवासाचा जिल्हा पर्याय निवडा
प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा जिल्हा पर्याय निवडा
सहप्रवासी असेल तर त्यांची संख्या नमूद करा
प्रवासाचा अंतिम ठिकाणचा पत्ता नमूद करा
आपण कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये आहात का पर्यायी उत्तर निवडा
परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहात का पर्यायी उत्तर निवडा
तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा
आधारकार्ड अपलोड करा
डॉक्टरांचे प्रमाणपत्र अपलोड करा
आणि शेवटी सबमिट बटन क्लिक करा.
आधारकार्ड प्रत आणि डॉक्टरांनी दिलेले आजारी नसल्याचे प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) अपलोड करा.