तळप बु. : १९७२-७३ मध्ये येथे धरण बांधण्यात आले. मात्र त्यानंतर ४0 ते ४५ वर्षामध्ये धरणाच्या देखभालीकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आजरोजी धरणाच्या भिंतीची दुरवस्था झाली असून गावाला धोका निर्माण झाला आहे. गावाच्या जलव्यवस्थापनासाठी अकोला जिल्हा परिषदेने हे धरण बांधले होते. मात्र सुरूवा तीचा काळ वगळता या धरणामुळे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. या धराच्या देखभालीसाठी चौकीदार नाही. धरणाचे पाणी सोडण्यासाठी एक गेट आहे. परंतु त्या गेटच्या सर्व साहित्याची चोरी करण्यात आली. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडेझुडूपे वाढली आहे. तसेच धरणाच्या भिंतीवरील अनेक ठिकाणी गोट निघाली आहे. धरणाच्या भिंतीची दयनिय अवस्था झाल्याने गावाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
धरणाच्या भिंतीची दुरवस्था
By admin | Updated: September 7, 2014 03:02 IST