ठळक मुद्देनादुरूस्तीचे प्रकार वाढले
वाशिम: ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’, हे ब्रीद मिरविणाºया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सद्या जुनाट बसेसवर सुरु आहे. ‘दे धक्का’ बसेसची संख्या वाढली असून नादुरूस्तीमुळे बस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार बळावल्याने प्रवाशांना नाहक मन:स्ताप सोसावा लागत आहे.
वाशिम आगाराअंतर्गत सद्या ५९ बसेस असून दैनंदिन ५ ते ६ बस तांत्रिक अडचणींमुळे ‘वर्कशॉप’मध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असतात. ग्रामीण भागात धावणाºया बसेसची दैनंदिन किरकोळ दुरुस्ती सुरुच असते. मात्र, त्याऊपरही प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. यामुळे प्रवासी पुरते वैतागले असून त्यांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.