वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला शुक्रवारी १६ मे रोजी होत असून गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्कंठा शेवटच्या चरणात शिगेला पोहोचली आहे. दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली असून दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. लोकसभा मतदारसंघात १0 एप्रिल रोजी मतदान झाले. तब्बल २६ उमेदवारांसाठी २00९ मतदान केंद्रावर ही प्रक्रिया राबविण्यात आली. १७ लाख ५४ हजार २३८ मतदारांपैकी दहा लाख ३१ हजार ५३३ जणांनी आपला हक्क बजावला. यामध्ये पाच लाख ६४ हजार २७६ पुरुष तर चार लाख ६७ हजार २५७ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ही २00९ च्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढली. मतदारसंघात गेल्या ३६ दिवसांमध्ये निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे.
प्रतीक्षा संपली, आज फैसला
By admin | Updated: May 15, 2014 22:57 IST