शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पीक सर्वेक्षणाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:17 IST

आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील  इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मूग, उडीद, पिकांची ५  सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच  दिसल्या नसल्याने शेतकर्‍यांविषयी चिंता व्यक्त करीत उ पविभागीय अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून  तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांच्या पिकांचा सर्व्हे करण्याच्या  सूचना त्यांनी दिल्या; परंतु अद्याप प्रशासनाकडून अशी  पीक  पाहणी झाली नाही.  

ठळक मुद्देप्रशासनाने दखल घेणे आवश्यक आमदार पाटणी यांनी केली होती सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील  इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मूग, उडीद, पिकांची ५  सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच  दिसल्या नसल्याने शेतकर्‍यांविषयी चिंता व्यक्त करीत उ पविभागीय अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून  तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांच्या पिकांचा सर्व्हे करण्याच्या  सूचना त्यांनी दिल्या; परंतु अद्याप प्रशासनाकडून अशी  पीक  पाहणी झाली नाही.   मानोरा तालुक्यात यंदा कमी पाऊस झाला. यामुळे शे तकर्‍यांनी कशीबशी केलेली पेरणी उलटली. दरम्यान, काही  उगविलेल्या बियाण्यांची वाढही झाली, मात्र याच पावसामुळे  या उभ्या पिकांना मालधारणाच झाली नाही. त्यातच मागील  महिनाभरापासून पावसाने दडी मारली असून, सद्यस्थितीत  उन्हाळ्यासारखे कडक ऊन तापत असल्याने शेतामधील  उभी पिके सुकत आहेत. त्यातच सोयाबीनच्या झाडांना  शेंगाही लागल्या नाहीत. याबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार  आमदार राजेंद्र पाटणी यांनी भाजपा कार्यकर्ते अजय  जयस्वाल उपसरपंच रवी काळेकर, नरेश आसावा, तसेच  शेतकरी राधेश्याम ठोक, दामोदर लांडगे, अजनी येथील  किशोर चिपडे, गोपाल ठाकरे, ठाकरे आदी शेतकर्‍यांसह  इंझोरीसह मानोरा तालुक्यातील काही शेतकर्‍यांच्या शेतांना  भेटी देऊन पिकाची पाहणी केली. त्यावेळी पीक परिस्थिती  बिकट असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे आमदार पाटणी यांनी कारंजा-मानोराच्या उ पविभागीय अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधना  आणि इंझोरीसह मानोरा तालुक्यातील पिकांची पाहणी  करण्याच्या सूचना दिल्या; परंतु अद्यापही संबंधित  प्रशासनाकडून या पीक पाहणीला सुरुवात करण्यात आली  नाही. 

जिल्हाधिकार्‍यांकडून परिस्थितीचा आढावाजिल्ह्यात यंदा अवर्षणामुळे खरिपातील पिके संकटात सा पडली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या  नसल्याचेही प्रकार घडले असून, पाण्याअभावी पिके सुकत  असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून पीक  पाहणी करण्याबाबत किंवा सर्वेक्षणाबाबत अद्याप निर्देश  नसले, तरी जिल्हा प्रशासन मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून  आहे. जिल्हाधिकारी वारंवार पीक परिस्थितीचा आढावा घेत  असून, कारंजाच्या उपविभागीय अधिकार्‍यांनीही  तहसीलदारांशी या संदर्भात चर्चा करून वरिष्ठांना वेळोवेळी  माहिती पाठविण्याच्या सूचना केल्याचे कळले आहे.

उपविभागीय अधिकार्‍यांनी पीक परिस्थितीबाबत आ पल्याशी चर्चा केली असून, मानोराच नव्हे, तर आमच्या  कारंजा तालुक्यातील पीक परिस्थितीबाबत वरिष्ठांना वारंवार  माहिती द्यावी लागेल, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

- सचिन पाटील, तहसीलदार कारंजा