शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधितांना १० वर्षांपासून मोबदल्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:56 IST

शिरपूर जैन: वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पांतर्गत कालव्यासाठी २००५ ते २००७ या कालावधित संपादीत केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अद्यापही संबंधित शेतकºयांना मिळालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पबाधित शेतकरी हताश झाले असून, येत्या महिनाभरात याची दखल घेण्यात न आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे या शेतकºयांनी सांगितले आहे. मालेगाव तालुक्यातील ...

ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनता: शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

शिरपूर जैन: वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पांतर्गत कालव्यासाठी २००५ ते २००७ या कालावधित संपादीत केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अद्यापही संबंधित शेतकºयांना मिळालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पबाधित शेतकरी हताश झाले असून, येत्या महिनाभरात याची दखल घेण्यात न आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे या शेतकºयांनी सांगितले आहे. 

मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पासाठी २००५ ते २००७ या कालावधित कालव्यांचे खोदकाम करण्यात आले. यामध्ये संजय गरड, गणपत घोडमोडे, सुभाष घोडमोडे, बबन घोडमोडे या शेतकºयांची शेतजमीन गेली. त्यामुळे संबंधित शेतकºयांना नियमानुसार शेतजमिनींचा मोबदला मिळणे अपेक्षीत होते; परंतु १० वर्षांहून अधिक काळ उलटला तरी, यामधील एकाही शेतकºयाला त्याच्या जमिनीचा मोबदला म्हणून दमडीही मिळाली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सदर कालव्याचे खोदकामही अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याचे बांधकाम करण्यात येणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित शेतकºयांनी वारंवार लघू सिंचन विभागासह इतर संबंधित अधिकाºयांकडे त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली; परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाले असून, येत्या महिनाभरात त्याची दखल घेऊन शेतजमिनीचा मोबदला मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शेतकºयांच्यावतीने देण्यात आला आहे.