शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विकलेल्या तुरीच्या मोबदल्याची प्रतीक्षा!

By admin | Updated: May 29, 2017 01:15 IST

शेतकरी अडचणीत: शासकीय केंद्रांकडे २० दिवसांपासून धनादेश स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: चांगले दर मिळतात म्हणून शासकीश खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. के वळ हमीभावाच्या आशेपोटी तूर विकलेल्या शेतकऱ्यांना मालेगाव्या नाफेड केंद्राकडून गेल्या २० दिवसांपासून मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. मालेगाव तालुक्यातील वाघी बु.येथील भाऊराव गणपत वाघ यांच्यासह १५ ते २० शेतकऱ्यांनी ७ मे रोजी मालेगाव येथील शासकीय खरेदी केंद्रात जवळपास ७५० क्विंटल तूर विकली. या तुरीचे चुकारे चार पाच दिवसांत मिळतील, अशी आशा त्यांना होती. तथापि, आता २० दिवस उलटले तरी, या शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाऱ्याचे धनादेशच मिळाले नाहीत. यंदा पावसाळा वेळपूर्वीच सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना शेतकऱ्यांच्या हाती पैसा असणे आवश्यक आहे; परंतु शेतमाल विकूनही वेळेवर पैसा मिळत नसल्याने शासन व्यवस्थेला शेतकरी कंटाळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या २० दिवसांपूर्वी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्याप मिळाले नाहीच आणि पुढे कधी मिळतील, तेसुद्धा निश्चित नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात पूर्वी नाफेडकडून, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने स्वत:च्या संस्थेसह सहकारी संस्थांद्वारे तुरीची खरेदी केली. तथापि, खरेदीसाठी आवश्यक रकमेची तरतूद केली नाही. खरीप हंगामाचे नियोजन बारगळण्याची भितीशासनाने शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने शासकीय तुरीची शासकीय खरेदी सुरू केली; परंतु त्यासाठी आवश्यक ते नियोजन केले नाही. त्यामुळे या खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले. वेळोवेळी खरेदीचे स्वरूप बदलणे, संथगतीने मोजणी करणे आणि मोजलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर न देणे या सर्व गोष्टींमुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आता महिन्याच्या सुरूवातीला विकलेल्या तुरीचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन आठवडाभरावर आलेल्या खरीप हंगामाचे नियोजनच बारगळण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अदा करणे आवश्यक झाले आहे.