शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील बायपासची प्रतिक्षा संपेना; काम अडकले लालफितशाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:11 IST

मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही.

ठळक मुद्देकोला येथून हैद्राबाद, हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणीकडे जागणाºया वाहनांसाठी अकोला रस्त्यावरून अकोला रस्त्यावर नागरदास मार्गे शेलुफाटा अशी वाहतूक वळती केल्या गेली.   या बायपासला मंजुरी मिळून तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही झाले; परंतु कामाचा अद्यापही प्रारंभसुद्धा झाला नाही.

- शंकर वाघ मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही. अकोला-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट या बायपासचे काम होणार कधी, ही प्रतिक्षा वाहनधारकांसह नागरिकांना लागली आहे.मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी शेलूफाटा रस्त्यावर तहसील कार्यालय, विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तसेच याच रस्त्याच्या परिसरात वीज वितरण कार्यालय असून, पंचाय समिती, ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारे मार्ग आणि बसस्थानक असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही वर्षांपूर्वी अकोला येथून हैद्राबाद, हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणीकडे जागणाºया वाहनांसाठी अकोला रस्त्यावरून अकोला रस्त्यावर नागरदास मार्गे शेलुफाटा अशी वाहतूक वळती केल्या गेली.  त्यामुळे आधीच वाहनांची वर्दळ असलेल्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली आणि तहसील कार्यालय व बसस्थानकासमोर वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली. वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी धोकादायक ठरत आहे. त्यातच नवरात्री उत्सवानिमित्त जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मालेगाव ते नागरदास या मार्गावर हजारो भाविक सकाळी ४.३० वाजतापासून पायदळ जात असतात. यामुळे नागरदास-अमानी या प्रस्तावित बायपासचे काम होणे आवश्यक आहे. साधारण ८ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार दिवंगत सुभाष झनक यांच्या प्रयत्नांमुळे या बायपासला मंजुरी मिळून तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही झाले; परंतु या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच हा रस्ता अकोला-हैद्राबाद या महामार्गात समाविष्ट करण्यात आला आणि कामाचे अधिकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आले. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाचा अद्यापही प्रारंभसुद्धा झाला नाही. अद्यापही मार्गावर दरदिवशी शेकडो वाहने धावत असून, भरधाव वाहनांमुळे अपघाताची भिती निर्माण झाली असतानाही या रस्त्याचे काम करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांवroad transportरस्ते वाहतूक