शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

ब्लिचिंग पावडरचा साठा न ठेवणा-या अधिका-याची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: December 2, 2015 03:18 IST

मानोरा गटविकास अधिका-यांची एका वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी केली.

वाशिम : ब्लिचिंग पावडरप्रकरणी वरिष्ठांचे आदेश न पाळणे आणि कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून मानोरा गटविकास अधिकार्‍यांची एका वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी केली. या कारवाईमुळे कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले असून, यापुढे कामचुकारांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. मानोरा तालुक्यातील सोमेश्‍वरनगर, ढोणी, रतनवाडी, धानोरा, कोंडोली, आमगव्हाण, एकलारा, आसोला, रोहणा, मोहगव्हाण, कारपा, पिंपळशेंडा, वडगाव, ज्योतीबानगर, बळीरामनगर, वाईगौळ, सावळी, धावंडा, चाकूर व विठोली या ग्रामपंचायतने सतत एक महिनाभर ब्लिचिंग पावडरचा साठा ठेवला नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात आले होते. संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले होते; मात्र या निर्देशांना गांभीर्याने न घेता मानोरा गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवकांकडून स्पष्टीकरणही मागितले नाही. कर्तव्यात दिरंगाई आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून गणेश पाटील यांनी गटविकास अधिकार्‍यांवर एका वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली.