शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथील वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 11:59 IST

Womens Cricket वृषालीची महिलांच्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ती श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

रिसोड : जिद्द, चिकाटी अंगी असेल आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर कुठलेच काम अशक्य राहत नाही, हे रिसोड येथील सन २०१८ मध्ये आईचे छत्र हरविलेल्या वृषाली इरतकर या मुलीने सिद्ध केले आहे. वृषालीची महिलांच्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ती श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तिच्या या यशामुळे रिसोडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचा सूर सर्व स्तरातून उमटत आहे.भारतासह अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, बांगलादेश आदी देशांमध्ये होणारी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या ४ ते ८ मार्च या कालावधीत श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यात भारताकडून प्रतिनिधित्व करीत असलेल्या महाराष्ट्रातील दोन मुलींमध्ये वृषाली इरतकर हिचा समावेश झालेला आहे. वृषालीच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई आणि भावाचा सन २०१८ मध्ये एका अपघातात मृत्यू झाला. वडिलांनी मात्र शहरातील बाजारात हातगाडी लावून भाजीविक्रीचा व्यवसाय करीत असताना वृषालीला आईची उणीव भासू दिली नाही. वृषालीनेदेखील प्रचंड मेहनत घेतली आहे. पहाटे चार वाजता झोपेतून उठून ती धावण्याचा सराव करते. पुष्पादेवी कला महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला ती शिक्षण घेत आहे. सोबतच वडिलांना हातभार लागावा, यासाठी तिने रिसोड येथेच एका खासगी कार्यालयात नोकरीसुद्धा पत्करली आहे. आठव्या वर्गात असताना तिला शाळेचे शिक्षक सुधीर देशमुख यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. त्या जोरावर तिने आज चक्क भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात स्थान पटकाविले आहे. 

टॅग्स :RisodरिसोडwashimवाशिमSri Lankaश्रीलंका