शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयांमध्ये गुंजणार ‘मतदार जनजागृती’चे सूर !

By admin | Updated: June 11, 2017 13:58 IST

शाळा, महाविद्यालयांमध्येदेखील मतदार जागृतीचा जागर केला जाणार आहे.

वाशिम : १ जुलै रोजी राज्यभर मतदार दिन म्हणून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या अनुषंगाने पश्चिम वऱ्हाडातील शाळा, महाविद्यालयांमध्येदेखील मतदार जागृतीचा जागर केला जाणार आहे.मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जुलै रोजी ह्यराज्य मतदार दिवसह्ण साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी होणाऱ्या पहिल्या राज्य मतदार दिवसाकरिता ह्यमतदार हाच नागरिक जबाबदारह्ण हे घोषवाक्य जाहीर केले आहे. यादिवशी वाशिम जिल्ह्यातील बीएलओ हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे घोषवाक्य असलेल्या बॅचेसचे वाटप करणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली. १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत १८ ते २१ वर्षे वयोगटातील पात्र प्रथम मतदारांची नाव नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे. याकरिता शासकीय आणि खाजगी शाळा, कॉलेजमध्ये नाव नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले १ ते ८ नमुन्यातील माहितीचे विश्लेषण करून लोकसंख्या व मतदार यांचे प्रमाण, लिंगगुणोत्तर व वयोगटनिहाय असलेली तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.विशेष मतदार नोंदणी मोहिमेमध्ये ८ जुलै व २२ जुलै २०१७ या दोन दिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी भेटी देवून जनजागृती करणार आहेत तसेच मतदारांचे विशेषत: १८ ते २१ वयोगटातील युवक-युवतींचे नव्याने मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेला नमुना ६ मधील अर्ज भरून घेणार आहेत. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, नागरी सेवा केंद्रासह पोस्टाद्वारेही नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेले नमुना ६ मधील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.  भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या अ‍ॅपद्वारेही नमुना ६ मधील अर्ज भरता येतील. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव वगळण्याची कार्यवाही विहित पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.