शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती स्तरावरही ‘व्हॉटस अ‍ॅप’ क्रमांक !

By admin | Updated: March 3, 2017 01:09 IST

तक्रार निवारणाचा असाही प्रयत्न : जिल्हा परिषदेचा उपक्रम

वाशिम, दि.२ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आता पंचायत समिती स्तरावरही ‘व्हॉटस अ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. पंचायत समितीच्या कक्षेतील संबंधित समस्यांबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. गावपातळीवर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, लघु सिंचन विभागाचे जलप्रकल्प, पाणीपुरवठा योजना, वैयक्तिक लाभाच्या विविध योजना आदींसंदर्भात नागरिकांना नानाविध गैरसोयींना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही समस्या किंवा तक्रारीचे निवारण झाले नाही, तर संबंधित लाभार्थीला नाइलाजाने जिल्हा परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यावे लागते. यामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यापूर्वी जिल्हा परिषदेने जिल्हा स्तरावर ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. सुरुवातीला या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारीही नोंदविल्या. त्यानंतर या क्रमांकावर तक्रारींचा ओघ कमी झाला. ही बाब लक्षात घेऊन आता पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र ‘व्हॉटस अ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ‘व्हॉटस अ‍ॅप’ क्रमांकावरील प्राप्त तक्रारींची नोंद करणे आणि सदर तक्रार संबंधित विभाग प्रमुखाकडे वळती करण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शौचालय व घरकुल योजनेचे अनुदान, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना यासह ग्रामपंचायत व पंचायत समितीशी संबंधित एखाद्या प्रलंबित कामांची तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारींचे निराकरण संबंधित विभाग प्रमुखांकडून केले जाणार आहे. गावपातळीवरील शाळा, आरोग्य केंद्र, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, पशू दवाखाना, ग्रामसेवक, शिक्षक यासह जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असेल तर नागरिकांना याबाबतची तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. यासाठी संबंधितांना स्वत:च्या नावाचा उल्लेख करावा लागणार आहे.