शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधून गावाबाहेरच काढल्या जाताहेत ‘विटा’!

By admin | Updated: April 6, 2017 02:08 IST

विटा सप्लाय करणारे ट्रकचालक गावाच्या बाहेरचं त्यातील काही विटा काढून त्याचा गोरखधंदा करीत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले आहे.

ग्राहकांना फटका : मोजणी न करताच उतरविल्या जातात विटावाशिम: बांधकामासाठी लागणाऱ्या विटा ग्राहक अव्वाच्या सव्वा पैसे देवून खरेदी करतात, मात्र विटा सप्लाय करणारे ट्रकचालक गावाच्या बाहेरचं त्यातील काही विटा काढून त्याचा गोरखधंदा करीत असल्याचे लोकमतने ३ व ४ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले आहे. वाशिम शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या विटा अकोला जिल्हयातील बाळापूर व चोहट्टा बाजार येैथून येतात. सदर विटांची मागणी असल्यास शहरात तसे एजंट आहेत. जागेवरुन माल आणत असतांना मागणीनुसार आणल्या जातो. परंतु विटांचा ट्रक वाशिममध्ये दाखल होण्यापूर्वी गावाबाहेरचं यामधील काही विटा काढून टाकल्या जात आहेत. ३ व ४ एप्रिल रोजी अकोला रस्त्याने हा प्रकार दिसून आला. विटा उतरविल्यानंतर थोडयाच वेळात रस्त्यावर उतरवून ठेवलेल्या विटा एका आॅटोमध्ये टाकून नेल्या जात असल्याचा प्रकार आढळून आला. यासंदर्भात एका ट्रकचालकाशी संवाद साधला असता वाहनातील हवा कमी झाल्याने भार कमी करीत असल्याचे सांगितले.या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ग्राहकांना वीटा मोजून देतांना हातचलाखी करुन त्या बरोबर जेवढयाची आॅर्डर दिली तेवढयाच मोजून दिल्या जात आहेत. वाशिम ते मालेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी ट्रकमधील विटा काही वेळापुरत्या उतरविल्याचे विटांच्या पडलेल्या तुकडयांवरुन दिसून येते. यासंदर्भात ग्राहक कोणाकडेही काही बोलतांना दिसून येत नाहीत. विटा मोजून घेतांना हजर राहिल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो. ‘त्या’ विटांची केल्या जातेय विक्रीट्रकमधून गावाबाहेर काढून ठेवलेल्या विटांची विक्री अनेक एजन्ट कडून खुली केल्या जाते. बांधकाम करतांना कोणास १००० , ५०० विटा कमी पडल्यास ते ग्राहकांना बोलाविणे परवडत नसल्याने शहरातील अनेक भागात विटा विकत मिळतात. त्या सर्वच ट्रकमधून काढलेल्या नसल्या तरी बहुतांश ठिकाणी मात्र असाच प्रकार चालू असल्याचे दिसून येते.