शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीआरसी’चा दौरा; जि.प.ची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा (पीआरसी) दौरा ऑगस्ट महिन्यात पंधरवड्यानंतर केव्हाही जिल्ह्यात धडकू शकतो. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कामकाजात पारदर्शकता राहावी, शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीने प्रस्तावित कामांवरच व्हावा, शासकीय नियमात हेराफेरी करणार्‍यांवर वचक ...

ठळक मुद्देप्रश्नावलीच्या दृष्टिने रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ प्रशासकीय इमारतीची अंतर्गत रंगोटीरंगरंगोटी, साफसफाईवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा (पीआरसी) दौरा ऑगस्ट महिन्यात पंधरवड्यानंतर केव्हाही जिल्ह्यात धडकू शकतो. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कामकाजात पारदर्शकता राहावी, शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीने प्रस्तावित कामांवरच व्हावा, शासकीय नियमात हेराफेरी करणार्‍यांवर वचक निर्माण व्हावा, गैरप्रकार करणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी, आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंचायत राज समितीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामीण) भेट देऊन  पाहणी केली जाते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या सर्वच विभागाची पोलखोल करण्याचे काम पंचायत राज समितीतर्फे केले जाते. दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्हा परिषदेला भेट देऊन पंचायत राज समितीने पाहणी केली होती. अकोल्यानंतर आता वाशिम जिल्हा परिषदेला भेट देऊन पंचायत राज समितीची चमू पाहणी करेल, अशी चर्चाही रंगली होती; मात्र याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती नव्हती. दरम्यान, आता जिल्हा परिषदेला पंचायत राज समितीच्या दौर्‍याच्या अनुषंगाने प्रश्नावली प्राप्त झाल्याने हा दौरा ऑगस्ट महिन्यात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अपवादात्मक परिस्थितीत हा दौरा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही होऊ शकतो, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने जिल्हा परिषदेच्या काही विभागांचे लेखा परीक्षण करताना काही आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपाच्या दृष्टिने सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सध्या प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.विविध योजनांतर्गतच्या साहित्याचे वाटप करताना शासकीय नियमांचा भंग तर झाला नाही ना? याचीही पडताळणी पंचायत राज समितीतर्फे होणार असल्याने सर्व ‘रेकॉर्ड’ अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे.

रंगरंगोटी, साफसफाईवर भरजिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील अंतर्गतच्या काही भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली तसेच स्वच्छतागृह व शौचालय गृहाची साफसफाईदेखील करण्यात आली. पंचायत राज समितीच्या दौर्‍यादरम्यान कुठेही अस्वच्छता राहू नये, दुर्गंंधी येऊ नये याची दक्षता आतापासूनच घेतली जात आहे. स्वच्छतागृह व शौचालय गृहाची नियमित साफसफाई होत असल्याने अधिकारी-कर्मचार्‍यांसह बाहेरगावावरून येणार्‍या नागरिकांना या स्वच्छतागृहासमोरून जाताना  तूर्तास तरी दुर्गंंधीचा सामना करावा लागत नाही.

पंचायत राज समितीच्या दौर्‍याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाला प्रश्नावली प्राप्त झाली आहे. दौर्‍याची तारिख अद्याप निश्‍चित नाही. ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात हा दौरा राहण्याची शक्यता आहे.- प्रमोद कापडेउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)जि.प. वाशिम