शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारी करणा-या दोघांना ग्रामस्थांनी पकडले

By admin | Updated: July 16, 2015 01:26 IST

पाच चोरट्यांपैकी दोघांना रंगेहात पकडले; वाशिम तालुक्यातील पांडव उमरा फाट्यावरील घटना.

वाशिम : वाटमारी करून पसार होण्याचा प्रयत्न करणार्‍या पाच चोरट्यांपैकी दोघांना रंगेहात पकडल्याची घटना वाशिम तालुक्यातील पांडव उमरा फाट्यावर १४ जुलै रोजी रात्री ८.३0 वाजता घडली. दोन्ही चोरट्यांना ग्रामस्थांनी ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. वाशिम ते शेलूबाजार मार्गावर अज्ञात पाच चोरट्यांनी तांदळी शेवई येथील वासुदेव दत्तुजी भुसारे यांची पांडव उमरा फाट्यावर मोटरसायकल अडवून बेदम मारहाण केली. या चोरट्यांनी भुसारे यांच्याजवळील रोख २३00 रुपये व मोबाइल हिसकावून मोटरसायकलने पळ काढला. तथापि, जखमी झालेल्या भुसारे यांनी आपली आपबीती तांदळी शेवई व पांडव उमरा येथील ग्रामस्थांना सांगितली. लगेचच दोन्ही गावांतील १५ ते २0 लोकांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सापळा रचला. या सापळ्यात मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी येथील बबलू ऊर्फ गणेश प्रकाश वाघमारे व अमोल देवराव घोडगे या दोघांना रंगेहात पकडण्यात यश मिळविले. ग्रामस्थांना चकमा देऊन तीन अनोळखी चोरटे पळ काढण्यात यशस्वी झाले. या घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांनी ठाणेदार विनायक जाधव यांना कळविली. पोलिसांनी वाघमारे व घोडगे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचेविरूध्द भादंविचे कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला. ग्रामस्थांनी एकजूट होऊन चोरट्यांना रंगेहात पकडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.